Tuesday, 2 May 2017

विष्यंदता (Viscosity)

कुठल्याही लिक्विडची विष्यंदता वाढणं म्हणजे त्याचा घट्टपणा वाढत जाणं. कुठल्याही लिक्विडची विष्यंदता वाढणं किंवा कमी होणं हे त्याच्या टेंप्रेचरवर, त्यात असणा-या पाण्यावर आणि इतर गोष्टीवर अवलंबून असतं. साधारणपणे टेंप्रेचर जसं वाढत जातं, तशी विष्यंदता कमी होत  जाते. उदा. डांबर तापवलं की ते पातळ होतं आणि मग ते पसरवता येतं.

नळीतून एखादं लिक्विड वाहत असेल, तर नळीच्या आतल्या सरफेसला लागून वाहणारा लिक्विडच्या रेणूंचा थर हा नळीच्या मध्यातून वाहणा-या थरापेक्षा कमी गतीने वाहतो. लिक्विडच्या रेणूंच्या दोन थरांमधलं घर्षण जितकं जास्त, तितकी विष्यंदता जास्त. घर्षण जितकं कमी, तितका प्रवाहीपणा जास्त.

विष्यंदतेशी येणारा आपला संबंध म्हणजे जारमधनं ग्लासमधे पाणी ओतताना होणारी फजिती! आपण जारच्या कडा ग्लास जवळ आणतो, पाणी सांडू नये म्हणून, पण जार तिरका केल्यावर भसकन् पाणी येतं आणि सांडतं. हे एक विष्यंदतेचं चांगलं उदाहरण आहे.

(दि. १७ एप्रिल २०१७ च्या दै. लोकसत्ताच्या ' कुतूहल ' ह्या सदरात आलेल्या लेखावर आधारित. मुळ लेखक- प्रा. लुम्बिनी जोशी)  

No comments:

Post a Comment