Monday, 22 May 2017

भारतीय विज्ञान संमेलन आणि प्रदर्शनात मला आलेला अनुभव...

१२ मे २०१७ ला भारतीय विज्ञान संमेलन आणि प्रदर्शन, फर्ग्यूसन कॉलेजला मी गेलो होतो. प्रदर्शनात दोन मोठे मंडप होते. मोकळ्या जागेत मिसाईल्स, तोफा, रोबोट्स, आणि काही खास मिलिट्रीसाठी उपयुक्त असे ट्रक्स होते.

त्याजागी ब्रम्होस, आकाश ही मिसाईल्स होती. ब्रम्होस हे सगळ्यात लेटेस्ट मिसाईल जवळून बघायला मिळालं. त्याची माहिती सुद्धा मिळाली, जशी ब्रम्होस कसं फायर करतात, त्याचा एक्सप्लोझिव पार्ट कुठला, तसंच ब्रम्होसच्या फायरिंगचे विडीओ क्लिप्स सुद्धा बघायला मिळाले.

प्रदर्शनात बॉम्ब्स डिफ्यूज करणारे रोबोट्स बघायला मिळाले. सगळ्यांचे डेमो बघितले. त्यातला एक रोबोट, हा बॉम्ब ऑटोमॅटिकली  स्कॅन करून उचलणारा होता. हा रोबोट बोम्ब उचलतो आणि आपण त्याला नेमून दिलेल्या जागेवर आणून ठेवतो. म्हणजे नंतर तो डिफ्यूज करता येतो. आणि समजा, बॉम्ब आणताना फूटला, तर रोबोट हा पूर्ण ऑटोमॅटिक असल्यामुळे जिवितहानी होत नाही, अशी माहिती मिळाली.

प्रदर्शनात एक क्वाडकॉप्टर बघितलं. ते शत्रूच्या गोटात काय चाललय हे बघण्यासाठी वापरतात. त्याचा सुद्धा डेमो बघितला.

नंतर मी दोन्ही मंडपांमधे जाऊन आतलं प्रदर्शन बघितलं. काही स्टॉल्स केमिस्ट्रीवरचे होते, तर काही  मायक्रोलॉजीवरचे होते. काही स्टॉल्स विद्यापीठांचे होते, त्या स्टॉल्सवर विद्यार्थ्यांचे ईन्वेंशन्स होते, तर काही संस्थांचे स्टॉल्स होते. खूप सारे विषय होते प्रदर्शनात. तिथे काही खास डि.आर.डि.ओ. चे स्टॉल्स होते. ह्या स्टॉल्सवर आर्मीत वारंवार वापरल्या जाणा-या, पण सामान्य नागरिकांमधे फारसे प्रसिद्ध नसणा-या वस्तू होत्या. एरोप्लेनने टाकण्यात येणारा बॉम्ब हा सगळ्यांना माहित असतो, पण तो कसा फूटतो, त्याचा आत काय असतं हे फारसं कोणाला माहित नसतं. त्याची
सविस्तर माहिती इथं मिळाली. अश्या ब-याच गोष्टींची माहिती मिळाली.

दोन मंडपांमधे जी जागा होती, तिथं मिसाईल्स, तोफा, आणि एक मिलिट्री ट्रक होता. तो ट्रक म्हणजे मोबाईल शेल्टर. मोबाईल शेल्टर आतून बघितला. त्याची बरीच माहिती मिळाली.

मला प्रदर्शन खूपच आवडलं. सगळी माणसं खूप इंट्रेस्टने माहिती सांगत होते त्यामुळं खूप माहिती मिळाली.

1 comment: