Wednesday, 12 April 2017

संख्यालेखन पद्धती

* जवळपास ५०,००० वर्षांपुर्वी सुद्धा मानवाला मोजण्याची क्रिया करता येत होती, असं पुरावे सांगतात. संख्या मोजण्याबरोबर त्या लिहायच्या कशा, हाही प्रश्न आला. म्हणून संख्यालेखन पद्धती शोधल्या गेल्या.
* बॅबिलोनिअन- सुमेरिअन संस्कृतीत संख्या लिहीण्याची जगातली पहिली पद्धत शोधली गेली, असं मानलं जातं. इसवी सन पुर्व ३००० च्या सुमारास प्रचलित झालेली, ६० ह्या संख्येवर आधारित ही पद्धत स्थानिक किमतीवर आधारित होती.
* युरोपात भारतीय दशमान संख्यालेखन पद्धत पोहचण्यापूर्वी तेथे रोमन संख्यालेखन पद्धत वापरात होती. ह्या पद्धतीत काही अक्षरांचा वापर विशिष्ट आकडे म्हणून केला जातो.
* ह्या पद्धतीत वापरण्यात येणारी अक्षरं आणि त्यांची किंमत खालील प्रमाणे-

I = १
V = ५
X = १०
L = ५०
C = १००
D = ५००
M = १०००

* ह्या अक्षरांचा वापर करुन इतर संख्या ही लिहिता येतात. या संख्या लिहिण्याचेही काही नियम आहेत. ते लक्षात ठेऊन रोमन पद्धतीत गूणाकार भागाकार करणं फार अवघड आहे.
* याशिवायही काही पद्धती अस्तित्वत होत्या. ग्रीक पद्धत, ही दशमान पद्धत आणि रोमन पद्धत यांचा संकर होती. याच पद्धतीतून रोमन पद्धत जन्माला आली. परंतु यात स्थानिक किमतीची पद्धत वापरली नव्हती. यात देखील अंक दर्शविण्यासाठी अक्षरांचा वापर केला जाई.

* या सर्वांत क्रांतिकारी बदल म्हणजे शुन्याचा शोध. भारतीय गणिततज्ज्ञांनी शुन्याचं महत्व एक संकल्पना म्हणून जाणलं व त्यास '०' हे चिन्ह दिलं. शुन्याचे 'संख्या' म्हणून गुणधर्म सांगणारा ब्रह्मगुप्त हा पहिला गणिती होय.
* १० ह्या संख्येवर आधारित भारतीय दशमान पद्धत स्थानिक किमतीवर आधारलेली आहे. या पद्धतीत कोणतीही संख्या ही तिच्यातल्या सर्व अंकाच्या स्थानिक किमतीच्या बेरजे इतकी असते.
* अरेबियन गणिततजज्ञांनी भारतीय दशमान पद्धत युरोपत नेली आणि तिथे सुद्धा ही पद्धत वापरली जाऊ लागली.

(दि. २७ मार्च २०१७ च्या दै. लोकसत्ताच्या 'कुतूहल' ह्या  सदरातून.
मूळ लेखक- चारुशीला सतीश जुईकर)

No comments:

Post a Comment