Sunday, 2 April 2017

एडमंड हॅले

* धूमकेतू म्हटलं, की आपल्याला आठवतो तो 'हॅले' चा धूमकेतू. या धूमकेतूचं नाव एडमंड हॅले या प्रसिद्ध शास्त्रज्ज्ञाच्या नावावरून दिलं गेलं.
* १६८२ साली हॅले यांनी हा धूमकेतू बघितला आणि त्याचा अभ्यास केला. या पूर्वी १४५६, १५३१, १६०८ या साली दिसलेला आणि १६८२ साली आपण पाहिलेला धूमकेतू एकच आहे, हे गणिताच्या साहाय्याने हॅले यांनी १७०५ साली सिद्ध केलं.
* हाच धूमकेतू पुन्हा १७५८ साली सूर्याजवळ येईल असं भाकित हॅले यांनी केलं. अर्थात, आपलं भकित खरं झालं की नाही हे पाहायला स्वतः हॅले जिवंत नव्हते, परंतु त्यांच्या भाकितानुसार १७५८ साली धूमकेतू मात्र दिसला.
* एडमंड हॅले हे केवळ खगोलशास्त्रज्ज्ञ नव्हते, तर ते नामांकित गणिततज्ज्ञ, भूगोलतज्ज्ञ, तसेच हवामानशास्त्रज्ज्ञ सुद्धा होते. त्यांची काही ठळक संशोधनं -
~ १६८६ साली हॅले यांनी व्यापारी वारे आणि मान्सून वारे यांचा अभ्यास करून काही तर्कशुद्ध आखाडे बांधले. सूर्यापासून उत्सर्जित होणारी उष्णता पृथ्वीवर सर्वत्र सारख्या प्रमाणात उपलब्ध होत नसल्याने वातावरण असमान तापतं. त्यामु्ळे वातावरणामधे हालचाल निर्माण होऊन वारे वाहतात; असा आखाडा हॅले यांनी बांधला.
~ त्यांनी हवेचा दाब आणि समुद्रसपाटीपासूनची उंची यांतला संबंध दर्शविणारी सारणी तयार केली.
~ विषुववृत्तावर सर्वात जास्त प्रमाणात उपलब्ध होणा-या सूर्याच्या उष्ण्तेमुळे वातावरण तापतं आणि हवा वर जाते. त्यामुळे विषुववृत्तीय प्रदेश हे उत्तर आणि दक्षिण दिशेकडून हवा खेचून घेतात. उत्तर आणि दक्षिण दिशेकडून खेचली जाणारी हवा म्हणजेच व्यापारी वारे. हॅले यांचा हा सिद्धांत ब-याच प्रमाणात अचूक ठरला.
* व्यापारी वा-यांच्या निर्मितीविषयीचा हॅले यांनी मांडलेला सिद्धांत म्हणजे वातावरणीय अभिसरणाबाबतीत आणि हवामानशास्त्राच्या प्रगतीतला एक महत्वाचा टप्पा मानला जातो.

(दै.लोकसत्ता मधून)



No comments:

Post a Comment