Friday, 21 April 2017

खोल समुद्रात...

* अथांग खोल समुद्र ही आपल्या पृथ्वीवर आढळणारी सर्वात मोठी परिसंस्था आहे. आपल्या पृथ्वीवर पसरलेल्या सागरापैकी तब्बल ८०% भाग ह्या परिसंस्थेने व्यापला आहे.
* सागराच्या खोल पाण्यात अंधारच असतो. सूर्यप्रकाश इथ पर्यंत पोचतच नाही. काही मोजक्या जागा सोडल्या तर खोल समुद्रात तापनान थंड, २-४ डिग्री सेल्सिअस दरम्यान असतं. इथं अन्न देखील मोजकंच असतं. इथलं अन्न प्रामुख्याने सेंद्रीय द्रव्यांच्या रूपात असतं.
* अशा प्रकारच्या प्रदेशातही या परिस्थितीशी अनुकूल असं जीवन बहरतं. इथे आढळणा-या कित्येक माशांमधे प्रकाश यनिर्मिती करणारे अवयव असतात.
* इथल्या काही माशांमधे अन्न मिळवण्यासाठी अनोखी उत्क्रांती झालेली आढळते. यांचे काही विशिष्ट अवयव भक्ष्याला फसवून आकर्षित करण्यासाठी खास विकसित झालेले असतात. आपण मासे पकडण्यासाठी वापरतो त्या गाळासदृश्य एक लांब अवयव अँगलर फिशच्या दोन डोळ्यांदरम्यान असतो. या लांब अवयवाकडे भक्ष्य अकर्षित होतं आणि अँगलर फिश त्यावर ताव मारतात.
* काही प्रजातींमधे अनोखे स्वयंप्रकाशित अवयव असतात, जे भक्ष्याला आकर्षित करतात.

(दि. १६ एप्रिल २०१७ च्या दै. लोकसत्ताच्या लोकरंग ह्या पुरवणीच्या 'जलपरीच्या राज्यात' ह्या सदरातून.
मुळ लेखक- ऋषिकेश चव्हाण)

Wednesday, 12 April 2017

संख्यालेखन पद्धती

* जवळपास ५०,००० वर्षांपुर्वी सुद्धा मानवाला मोजण्याची क्रिया करता येत होती, असं पुरावे सांगतात. संख्या मोजण्याबरोबर त्या लिहायच्या कशा, हाही प्रश्न आला. म्हणून संख्यालेखन पद्धती शोधल्या गेल्या.
* बॅबिलोनिअन- सुमेरिअन संस्कृतीत संख्या लिहीण्याची जगातली पहिली पद्धत शोधली गेली, असं मानलं जातं. इसवी सन पुर्व ३००० च्या सुमारास प्रचलित झालेली, ६० ह्या संख्येवर आधारित ही पद्धत स्थानिक किमतीवर आधारित होती.
* युरोपात भारतीय दशमान संख्यालेखन पद्धत पोहचण्यापूर्वी तेथे रोमन संख्यालेखन पद्धत वापरात होती. ह्या पद्धतीत काही अक्षरांचा वापर विशिष्ट आकडे म्हणून केला जातो.
* ह्या पद्धतीत वापरण्यात येणारी अक्षरं आणि त्यांची किंमत खालील प्रमाणे-

I = १
V = ५
X = १०
L = ५०
C = १००
D = ५००
M = १०००

* ह्या अक्षरांचा वापर करुन इतर संख्या ही लिहिता येतात. या संख्या लिहिण्याचेही काही नियम आहेत. ते लक्षात ठेऊन रोमन पद्धतीत गूणाकार भागाकार करणं फार अवघड आहे.
* याशिवायही काही पद्धती अस्तित्वत होत्या. ग्रीक पद्धत, ही दशमान पद्धत आणि रोमन पद्धत यांचा संकर होती. याच पद्धतीतून रोमन पद्धत जन्माला आली. परंतु यात स्थानिक किमतीची पद्धत वापरली नव्हती. यात देखील अंक दर्शविण्यासाठी अक्षरांचा वापर केला जाई.

* या सर्वांत क्रांतिकारी बदल म्हणजे शुन्याचा शोध. भारतीय गणिततज्ज्ञांनी शुन्याचं महत्व एक संकल्पना म्हणून जाणलं व त्यास '०' हे चिन्ह दिलं. शुन्याचे 'संख्या' म्हणून गुणधर्म सांगणारा ब्रह्मगुप्त हा पहिला गणिती होय.
* १० ह्या संख्येवर आधारित भारतीय दशमान पद्धत स्थानिक किमतीवर आधारलेली आहे. या पद्धतीत कोणतीही संख्या ही तिच्यातल्या सर्व अंकाच्या स्थानिक किमतीच्या बेरजे इतकी असते.
* अरेबियन गणिततजज्ञांनी भारतीय दशमान पद्धत युरोपत नेली आणि तिथे सुद्धा ही पद्धत वापरली जाऊ लागली.

(दि. २७ मार्च २०१७ च्या दै. लोकसत्ताच्या 'कुतूहल' ह्या  सदरातून.
मूळ लेखक- चारुशीला सतीश जुईकर)

Sunday, 2 April 2017

एडमंड हॅले

* धूमकेतू म्हटलं, की आपल्याला आठवतो तो 'हॅले' चा धूमकेतू. या धूमकेतूचं नाव एडमंड हॅले या प्रसिद्ध शास्त्रज्ज्ञाच्या नावावरून दिलं गेलं.
* १६८२ साली हॅले यांनी हा धूमकेतू बघितला आणि त्याचा अभ्यास केला. या पूर्वी १४५६, १५३१, १६०८ या साली दिसलेला आणि १६८२ साली आपण पाहिलेला धूमकेतू एकच आहे, हे गणिताच्या साहाय्याने हॅले यांनी १७०५ साली सिद्ध केलं.
* हाच धूमकेतू पुन्हा १७५८ साली सूर्याजवळ येईल असं भाकित हॅले यांनी केलं. अर्थात, आपलं भकित खरं झालं की नाही हे पाहायला स्वतः हॅले जिवंत नव्हते, परंतु त्यांच्या भाकितानुसार १७५८ साली धूमकेतू मात्र दिसला.
* एडमंड हॅले हे केवळ खगोलशास्त्रज्ज्ञ नव्हते, तर ते नामांकित गणिततज्ज्ञ, भूगोलतज्ज्ञ, तसेच हवामानशास्त्रज्ज्ञ सुद्धा होते. त्यांची काही ठळक संशोधनं -
~ १६८६ साली हॅले यांनी व्यापारी वारे आणि मान्सून वारे यांचा अभ्यास करून काही तर्कशुद्ध आखाडे बांधले. सूर्यापासून उत्सर्जित होणारी उष्णता पृथ्वीवर सर्वत्र सारख्या प्रमाणात उपलब्ध होत नसल्याने वातावरण असमान तापतं. त्यामु्ळे वातावरणामधे हालचाल निर्माण होऊन वारे वाहतात; असा आखाडा हॅले यांनी बांधला.
~ त्यांनी हवेचा दाब आणि समुद्रसपाटीपासूनची उंची यांतला संबंध दर्शविणारी सारणी तयार केली.
~ विषुववृत्तावर सर्वात जास्त प्रमाणात उपलब्ध होणा-या सूर्याच्या उष्ण्तेमुळे वातावरण तापतं आणि हवा वर जाते. त्यामुळे विषुववृत्तीय प्रदेश हे उत्तर आणि दक्षिण दिशेकडून हवा खेचून घेतात. उत्तर आणि दक्षिण दिशेकडून खेचली जाणारी हवा म्हणजेच व्यापारी वारे. हॅले यांचा हा सिद्धांत ब-याच प्रमाणात अचूक ठरला.
* व्यापारी वा-यांच्या निर्मितीविषयीचा हॅले यांनी मांडलेला सिद्धांत म्हणजे वातावरणीय अभिसरणाबाबतीत आणि हवामानशास्त्राच्या प्रगतीतला एक महत्वाचा टप्पा मानला जातो.

(दै.लोकसत्ता मधून)