पाणी, अतिशय महत्वाची गोष्ट. मानवाला रोज – रोज लागणारी. मानव पाण्याच्या शुद्धतेबाबत खूप जागरूक असतो. त्यातल्या त्यातही मानव प्यायच्या पाण्याची फार काळजी घेतो. म्हणूनच ब-याच माणसांकडे ‘वॉटर प्युरिफायर’ असतात. ‘आरओ वॉटर प्युरिफायर’, ‘युव्ही वॉटर प्युरिफायर’ असे खूप प्रकार असतात. पण तुम्हाला माहितीये का, की ‘आरओ ट्रिटमेंट’, ‘युव्ही ट्रिटमेंट’ हे पाण्यावर तर अत्याचार आहेतच, पण त्याचबरोबर आरओ, युव्ही ट्रिटेड पाणी मानवालाही हानिकारक आहे.
२२ जुलै २०१७ ला मी श्री. जनक दफ्तरी यांचं सेशन अटेंड केलं होतं. जनक दफ्तरी हे पर्यावरण कार्यकर्ते आणि जलबिरादरी संघटनेचे सदस्य आहेत. त्यांनी बरेच मुद्दे मांडले. त्यातला हा एक होता की प्रत्येक प्रदेशाचं पाणी वेगवेगळं असतं. प्रत्येकाची चव, प्रत्येकाचा वास वेगवेगळा असतो. त्यात वाईट बॅक्टेरियांसोबत चांगले बॅक्टेरियासुद्धा असतात. ते आपलं पोषण करतात. ते आपल्याला गरजेचे असतात. पण तरी, आपल्याला पाण्याची चव थोडी वेगळी लागली, की आपण प्युरिफायर बसवतो आणि पाण्यातले सगळे मिनरल्स, चांगले बॅक्टेरिया काढून टाकतो. असं केल्यामुळं काय होतं, की आपण पाणी पिलं, की ते पाणी आपलं पोषण तर करत नाही, वरनं आपल्या शरिरातले मिनरल्स खेचून घेतं. त्याने आपल्या शरीरात डेफिशिएन्सी निर्माण होते.
ही डेफिशिएन्सी होऊ नये आणि शुद्ध पाणी मिळावं म्हणून नैसर्गिक असे उपाय सुद्धा आहेत. त्यातला एक म्हणजे पाणी उकळून माठात भरणे आणि माठात चांदीचा तुकडा घालणे.
पाणी उकळल्याने त्यातले सगळे जीवाणू मरतात. ते माठात ठेवलं, त्यात चांदी टाकली की त्यात थोडे चांगले गुण, मिनरल्स येतात. माठामधे पाणी ठेवल्याने भाजलेल्या मातीचे गुण पाण्यात उतरतात. छान चव येते, मातीतले जीवनावश्यक जीवाणू त्यात येतात आणि त्यात चांदी घातली की पाण्यातले वाईट जीवाणू मरतात. त्याचबरोबर चांदी, ही योग्यप्रमाणात कशा ना कशाद्वारे घेतली, तर शरीरास चांगली असते.
पाणी काचेच्या बाटलीत भरून उन्हात ठेवलं की त्यातले नेमके वाईट, हानिकारक जीवाणू मरतात. कारण, उकळल्यावर पाणी जितकं गरम होतं त्यापेक्षा उन्हात ठेवल्यानं तुलनेनं कमी गरम होतं.
अजून खूप उपाय आहेत पाणी शुद्ध करायचे. ब-याच ठिकाणी ते वापरले जातात, पण तरी त्यांचं प्रमाण कमी आहे. आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे, की नैसर्गिक पद्धतीने पाणी शुद्ध केल्यास त्याचा फायदा होतो. पण जर ते अनैसर्गिक पद्धतीने शुद्ध केलं, तर त्याचा फायदा होण्यापेक्षा तोटाच जास्त होतो…
- शंतनु शिंदे
shantanuspune@gmail.com

No comments:
Post a Comment