५ जानेवारीला, मी अदित्य गार्डन सिटीमधे पार पडलेल्या ‘स्पेस टेक्नॉलॉजी एक्झिबिशन’ला गेलो होतो. रॉकेट्स, स्पेस मिशन्स, युनिवर्स, या संबंधी माहितीचा आणि शॉर्टफिल्म्सचा तो एक खजिनाच होता. मला ह्यातून खूप सारी माहिती मिळाली.
आदित्य गार्डन सिटी (वारजे, पुणे)च्या क्लब हाऊसमधे हे एक्झिबिशन होतं. तळ मजल्याच्या हॉलमधे एक्झिबिशन होतं तर वरच्या मजल्यावर हॉलमधे शॉर्टफिल्म्स दाखवल्या जात होत्या. मी आधी एक्झिबिशन बघायला गेलो. प्रदर्शनात इस्रोच्या स्पेस मिशन्सबद्दल माहिती होती, रॉकेट्सचे काही मोठे मॉडेल्स होते, स्पेसमधल्या विविध घटकांची माहितीही होती. प्रत्येक बॅनरपाशी, मॉडेलपाशी एक्सप्लेन करायला काही मुलं होती. अत्यंत व्यवस्थितपणे ते प्रत्येकाला माहिती समजावून सांगत होते. बॅनरमधी लिहिलेल्या काही गोष्टी कळाल्या नाहीत, किंवा मॉडेलमधल्या कुठल्या भागाविषयी अधिक माहिती हवी असेली, तरी ते जण एकदम छानपैकी समजावून सांगत होते.
इस्रोचं पहिलं रिसर्च सेंटर कुठं उभारलं गेलं होतं माहितीये? तिरूवअनंतपुरम् जवळच्या थुम्बा नावाच्या गावातल्या एका चर्चमधे!
ही माझ्यासाठी एकदम नवी माहिती होती. तिथं रॉकेट्सची हालवाहालव करताना सायकल, बैलगाडी अशी वाहनं वापरली जायची. ॲपल या मोबाईल, लॅपटॉप बनवणाऱ्या सध्याच्या सगळ्यात मोठ्या कंपनीचं सगळ्यात पहिलं सॅटलाईट थुम्बा इथूनच लॉन्च करण्यात आलं होतं. इस्रोच्या अशा अनेक मिशन्सची माहिती काही बॅनर्समधे विभागून लावली होती. प्रत्येक बॅनरपाशी माहिती एक्सप्लेन करायला मुलं होतीच.
ह्यातून बरेच दिवस ऐकून असलेल्या काही शॉर्टकट्सबद्दल मला माहिती मिळाली. जी.एस.एल.व्ही. (GSLV) याचा फुलफॉर्म आहे जीयोसिक्रोनस सॅटलाईट लॉन्च व्हैकल. जियोसिक्रोनस अर्थ ऑर्बीट (GEO) आणि जियोसिक्रोनस ट्रान्सफर ऑर्बीट (GTO) यांमधे सॅटलाईटला नेऊन सोडायचं काम जी.एस.एल.व्ही. करतात. पी.एस.एल.व्ही. (PSLV) याचा फुलफॉर्म आहे पोलार सॅटलाईट लॉन्च व्हैकल. सन सिक्रोनस ऑर्बीट, पोलार ऑर्बीटमधे सॅटलाईट पाठवण्यासाठी याचा वापर करतात. सन सिक्रोनस ऑर्बीट, पोलार ऑर्बीट ही जी.टी.ओ. (GTO), जी.ई.ओ. (GEO) ऑर्बीट्सपेक्षा कमी उंचीवर असतात. जी.एस.एल.व्ही. हे साधारणपणे पी.एस.एल.व्ही.पेक्षा जास्त ताकदवर असतात. पी.एस.एल.व्ही. रॉकेट्सना चार स्टेजेस असतात. त्यातल्या काही लिक्वीड फ्यूअल वापरणाऱ्या, तर काही सॉलिड फ्यूअल वापरणाऱ्या असतात. जी.एस.एल.व्ही रॉकेट्सना शेवटच्या स्टेजला ‘क्रायोजेनिक’ इंजिन वापरलेलं असतं. ह्या इंजिनचं फ्यूअल असतं, लिक्वीड हायड्रोजन आणि लिक्वीड ऑक्सिजन. ह्या दोन्ही वायूंना द्रवरूपात आणायला उणे २०० डिग्री सेल्सिअस पर्यंत थंड करावं लागतं…! ह्या स्टेजमुळे जी.एस.एल.व्जी. रॉकेट्सना जास्त ताकद लाभली आहे.
जी.एस.एल.व्ही. रॉकेट्सची निर्मिती करताना भारताने रशियाकडे ‘क्रायोजेनिक’ इंजिनची मागणी केली होती. पण आपण ही टेक्नॉलॉजी वापरून मिसाईल्स बनवू, अशी भिती वाटून रशियाने आपल्याला नकार दिला होता. मग आपण स्वतःच ‘क्रायोजेनिक’ टेक्नॉलॉजीची निर्मिती करायला सुरूवात केली आणि त्याचंच फळ म्हणून आपण ‘जी.एस.एल.व्ही. मार्क ३’ (GSLV Mk III)ची निर्मिती केली आहे, आपलं सध्याचं सगळ्यात शक्तिशाली रॉकेट!
इस्रोच्या मिशन्सची माहिती घेतल्यावर, बाजूलाच ठेवलेले काही मॉडेल्स मी बघितले. तिथं एक सॅटलाईटचं मॉडेल होतं, ज्याची स्केल फक्त १:१० होती! म्हणजे ते मॉडेल दहापट मोठं केल्यावर हुबेहूब खऱ्या सॅटलाईट सारखं झालं असतं…! तिथे आणखी पी.एस.एल.व्ही. आणि जी.एस.एल.व्ही.चेही मॉडेल्स होते...
त्या नंतर ‘मंगळयान’ ह्या इस्रोच्या मार्स मिशनची माहिती मिळाली. हे मिशन आपलं एक एक्सपेरिमेन्ट होता… ह्याचा प्लॅन्ड कार्यकाळ सहा महिने होता, पण सहा महिने उलटून गेले तरी अजुनही ते चालू आहे! अजुन वर्षभर ते चालू राहिल असा अंदाज आहे. ह्या मिशनसाठी आपलं बजेट इतर देशांच्या तुलनेत बरंच कमी होतं. तरीही आपण मंगळयान पहिल्या प्रयत्नात यशस्वीपणे लॉन्च केलं. मंगळावर पहिल्या प्रयत्नात यशस्वीपणे यान पाठवणारे आपण पहिले आहोत! हे कमी खर्चात कसं पार पाडण्यात आलं, ह्यासाठी काय योजना वापरण्यात आली, हे शॉर्टफिल्ममधे दाखवण्यात आलं.
मंगळयानानंतरचं पोस्टर होतं, आर.एल.व्ही – टी.डी. (RLV – TD) ह्याचं. आर.एल.व्ही – टी. डी.चा फुलफॉर्म आहे, रियुजेबल लॉन्च व्हैकल – टेक्नॉलॉजी डेमॉन्स्ट्रेटर. होतं असं, की एक रॉकेट लॉन्च केलं, की त्याचा साधारण १०० टक्क्यांपैकी १० टक्केच भाग परत पृथ्वीवर येतो. हा रेशो कमी करण्यासाठी, इस्रो ही टेक्नॉलॉजी तयार करत आहे. हे आर.एल.व्ही., पृथ्वीवर विमानासारखं लॅन्ड करणार. (ह्याच्या रिसेंट टेस्टच्या वेळी पाण्यात स्प्लॅश करण्यात आलं, कारण भारतात सध्या तरी आर.एल.व्ही लॅन्ड करण्याइतका मोठा रनवे नाहीये.) आवकाशात जाताना हे रॉकेटच्या पुढच्या भागावर लावलेलं असणार.
त्यानंतर भारताच्या स्वतःच्या जी. पी. एस.ची माहिती मिळाली. त्यासाठी आपण ७ सॅटलाईट्स लॉन्च केली आहेत. आवकाश कुठं सुरू होतं, हे कळालं. समुद्रसपाटीपासून साधारण १०० किमीवर आवकाश सुरू होतं.
आपल्या ‘मिल्की वे’मधे काही अब्ज तारे आहेत. काही सुर्याएवढे पण. मग अजुन पृथ्व्या असायला काय हरकत? आपल्या अकाशगंगेतच साधारण ४० अब्ज पृथ्व्या असतील असा अंदाज आहे. (ज्यावर जीवसृष्टी शक्य आहेत असे ग्रह… म्हणजे एलियनऽऽ!)
ॲस्ट्रॉनॉट लाईफ बद्दल मला कळालं. त्यांना खूप अडचणी असतात. वजन नसल्यासारखं वाटणं, पाणी कमी उपलब्ध असणं, छोट्या जागा असणं, खाण्याचे चॉईसेस कमी असणं, कमी झोप, आणि असं बरंच काही… खरंच, तरी माणसांना आवकाशात जावंसं वाटतं… विचित्रंच…
त्यानंतर मी शॉर्टफिल्म्स बघायला गेलो. त्यांनी दाखवलेल्या शॉर्टफिल्म्स खूप माहितीपूर्ण होत्या. त्या फिल्म्स आपल्या अत्याधुनिक रॉकेट, जी.एस.एल.व्ही. मार्क ३ची माहिती देणाऱ्या होत्या, मंगळयानाची माहिती देणाऱ्या होत्या; एक स्पेसवॉकचा व्हिडियो पण मी बघितला.
मंगळयान मिशनसाठी आपलं बजेट बऱ्यापैकी कमी होतं. असं असूनही आपण ही मोहिम कशी काय राबवली, हे एका व्हिडियोमधून कळालं. फिल्म दाखवणाऱ्या त्या जाणकार दादाने ते अगदी व्यवस्थित समजावून पण दिलं. आपल्या मंगळयानाने मंगळाच्या दिशेने कूच करण्याआधी पृथ्वीला काही प्रदक्षिणा घातल्या होत्या. २ – ३ प्रदक्षिणा घातल्यावर, शेवटच्या प्रदक्षिणेला पुरेसा फोर्स मिळाल्यावर मग यानाने मंगळाच्या दिशेने जायला सुरूवात केली होती. असं का?
तर, कुठल्याही यानाला जर अगदी सरळ पद्धतीने पृथ्वीचा ग्रॅविटेशनल फोर्स, पृथ्वीचं वातावरण भेदून जायचं असेल तर जास्त एनर्जी, जास्त फ्यूअल लागतं. यामुळं सहाजिकच खर्च वाढतो. त्याऐवजी जर यानाने प्रदक्षिणा घालून वातावरण भेदलं, तर कमी एनर्जी लागते, कमी फ्यूअल लागतं, आणि त्यामुळे ही पद्धत कमी खर्चिक असते.
मंगळयानाने पृथ्वीला घातलेल्या प्रदक्षिणा ह्या अंडाकृती होत्या. एका पॉइंटला जवळ येऊन यान अधिकधिक लांब जात होतं. पृथ्वीच्या जवळ आल्यामुळे यानाला फोर्स मिळत होता, आणि या फोर्समुळे कमीतकमी फ्यूअल वापरून यानाला मंगळापर्यंत पोचता आलं. मंगळावर उतरताना यान आपटू नये म्हणूनही ते प्रदक्षिणा घालत घालतच उतरलं.
स्पेस वॉकचा व्हिडियो दाखवण्याआधी चंद्र आणि पृथ्वी यांमधे गुरूत्वाकर्षण असतं का? यावर चर्चा झाली. खरंतर चंद्र, पृथ्वीला पृथ्वीच्या गुरूत्वाकर्षणामुळेच प्रदक्षिणा घालतो. आणि कुठलंही पृथ्वीला प्रदक्षिणा घालणारं यान हे चंद्राच्या पलिकडे जाऊन पृथ्वीला प्रदक्षिणा घालत नाही. मग अशा यानातले लोक तरंगतात कसे? तर पृथ्वी आणि चंद्रामधल्या सगळ्या ऑर्बिट्समधे थोड्या प्रमाणात ग्रॅविटी असते, आणि त्यामुळेच यानही पृथ्वीला प्रदक्षिणा घालत असल्याने ॲस्ट्रॉनॉटला ग्रॅविटी जाणवत नाही.
पण पृथ्वीच्या ग्रॅविटीमुळे सॅटलाईट प्रदक्षिणा कसं काय घालतं? हे समजावण्यासाठी एक उदाहरण देतो.
समजा, तुम्ही एक दगड जमिनीशी एक कोन राखून जोरात फेकला, तर काय होईल?
तो दगड इलिप्टिकल मार्गाने प्रवास करून, साधारण आणि ढोबळपणे, पृथ्वीचा एक चतुर्थांष भाग पार करून पडेल. अजुन जोरात फेकला तर दोन चतुर्थांष भाग पार करेल. अजुन जोरात फेकला तर तीन चतुर्थांष, आणि अजुन जोरात फेकला, तर पुर्ण पृथ्वीला फेरी मारून तो तुमच्या डोक्याच्या मागच्या बाजूला लागेल.
त्याच प्रमाणे, सॅटलाईट जेव्हा पृथ्वीला प्रदक्षिणा घालत असतं, तेव्हा ते खरंतर ‘खाली पडत’ असतं. ग्रॅविटीच्या ओढ्यामुळे सॅटलाईट गोलगोल फिरत पृथ्वीपर्यंत येणं अपेक्षित असतं, पण त्यात केलेल्या सेटिंग्जमुळे आणि इतर काही फॅक्टर्जमुळे ते कधी पृथ्वीपर्यंत पोचत नाही.
या गोष्टीचा मी कधी विचारच केला नव्हता… सॅटलाईटला प्रदक्षिणा घालायला ग्रॅविटी मदत करत असेल, असं कधी वाटलं नव्हतं.
एकूण ह्या प्रदर्शनाने मला बरीच माहिती दिली आहे... आदित्य गार्डन सिटीचे
खूप खूप आभार!

No comments:
Post a Comment